
मुख्याध्यापक
मनोगत
विद्यालयाची स्थापना सन 1983 साली दक्षिण मांड नदीच्या कुशीमध्ये करण्यात आली. संस्थेचे सचिव मा.अशोकराव थोरात भाऊ यांच्या प्रेरणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पोतले येथे विद्यालयाची स्थापना 1983 साठी करण्यात आली. सुरुवातीपासून परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने अनेक कठीण प्रसंगातून व मदतीने मार्गक्रमण करीत दिवसेंदिवस.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात यश मिळवले आहे. आज अखेर विद्यालयाने एस.एस.सी बोर्ड निकालात परिसरातील विद्यालयापेक्षा आघाडी घेतली आहे. सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत कराड तालुक्यातील एक वेगळा बौद्धिक लौकिक निर्माण केलेला दिसून येतो .तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव निर्माण करण्यात यशस्वी झाले असून आमचे विद्यालय इतर स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धेमध्येही यशस्वी झालेली दिसून येते.
“ ज्ञान सरिता नित्य खळखळे, विज्ञान संस्कार पिकती मळे ’’ या संस्थेच्या उक्तीनुसार आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या विद्यालयाचा.
धन्यवाद ....!

मुख्याध्यापक
श्री. पवन राजाराम पाटील
M.A B.P.ed.D.S.M
विद्यालयाची वैशिष्ट्ये
* इ. ५ वी ते १० वी वर्गाना मर्यादित प्रवेश.
* अनुभवी प्रशिक्षित शिक्षकवृंद.
* बेसिक संगणक वर्ग व ई-लर्निंग वर्ग, अद्यावत संगणक कक्ष.
* मुलांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी वॉटर फिल्टरची सोय.
* मर्यादित विद्यार्थी व प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
* स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय.
* विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे.
* संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी विज्ञान प्रदर्शन आयोजन.
* सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन.
* पालकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम.
* विविध शालेय स्पर्धांचे आयोजन.
* इ. ५ वी व ८ वी N.M.M.S. शिष्यवृत्ती १००% निकालाची परंपरा.
* इ. ५ वी ते १० वी ऑलंपियाड, मंथन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
* राज्यात व राज्याबाहेर सहलींचे आयोजन.
* गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी.
* क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन.
उद्दिष्टे

आजूबाजूच्या परिसराचा विचार करता सर्वसामान्यांनाही उच्च दर्जाचे संस्कारक्षम व जीवन विकासाचे शिक्षण मिळावे ह्या दूरदृष्टीकोनातून आनंदराव चव्हाण विद्यालयाची स्थापना केली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने.
शालेय गुणवत्ता वाढीसाठी सर्वांगीण मार्गदर्शन करणे.
तार्किक बुद्धीचा विकास करणारी मूलभूत गणिती कौशल्य संपादन व त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यास मदत करणे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे. निरीक्षण तुलना वर्गीकरण प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे व त्यांचे निवेदन करणे यासारखी मूलभूत कौशल्य निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना स्व प्रयत्नातून ज्ञान प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
परिसर आणि मानवी जीवन यांतील परस्पर संबंध समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे.
परिवर्तन आणि देशाची परंपरा व वारसा यांची निरंतरता यामध्ये संतुलित समन्वय राखण्यासाठी योग्य अशी जाणीव निर्माण करणे.
विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांची जोपासना करणे.
विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणे.