top of page

विज्ञान दिन
28 फेब्रुवारी विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये सायन्स एक्झिबिशनचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी स्वत:ची उपकरणे शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून आणतात. विद्यालयाच्या पटांगणावर त्याचे आकर्षक मांडणी करून पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षीस व सन्मान चिन्ह भेट देऊन कौतुक केले जाते या प्रदर्शनास परिसरातील अनेक नागरिक भेट देतात या स्पर्धेतून भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये एक शास्त्रज्ञ निर्माण व्हावा या हेतूने उपक्रम आयोजित केला जातो.

विज्ञान प्रदर्शन
28 फेब्रुवारी विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये सायन्स एक्झिबिशनचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी स्वत:ची उपकरणे शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून आणतात. विद्यालयाच्या पटांगणावर त्याचे आकर्षक मांडणी करून पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशा स्वरूपात स्पर्धेचे आयोजन केले जाते. विभाग वार्ड क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षीस व सन्मान चिन्ह भेट देऊन कौतुक केले जाते या प्रदर्शनास परिसरातील अनेक नागरिक भेट देतात या स्पर्धेतून भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये एक शास्त्रज्ञ निर्माण व्हावा या हेतूने उपक्रम आयोजित केला जातो.

शालेय भित्तिपत्रक प्रदर्शन
वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये भित्तीपत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांची कला कौशल्य विकसित होण्यास मदत होते

दिल्ली लाल किल्ला सहल
विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा असलेल्या दिल्लीच्या लाल किल्ल्याची ओळख व्हावी या दृष्टीने विद्यालयाची इयत्ता सातवी ते नववी या वर्गाची शैक्षणिक सहल आयोजित केली शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीतील लाल किल्ला एक उत्तम ठिकाण आहे लाल किल्ला दिल्लीतील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला लाल रंगाच्या दगडांनी बांधलेला असल्यामुळे लाल किल्ला म्हणून ओळखला जातो.

प्रतापगड सहल
प्रतापगड सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांची माहिती व्हावी ,यासाठी प्रतापगड सहलीचे आयोजन केले. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला होता, आणि अफजलखान व छत्रपती शिवाजी महाराजांमधील लढाईचे ठिकाण म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे.

वृक्षारोपण
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने विद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून दरवर्षी पंतोजी मळा, गणेश मंदिर परिसर तसेच घारेवाडी धुळोबा डोंगर परिसर येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बियांची संकलन करून त्याचे चेंडू म्हणजेच सिडबॉल बनवतात आणि हवामानानुसार वृक्ष लागवड करतात. वृक्षारोपण ही केवळ पर्यावरणासाठीच नाही तर मानवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे पर्यावरणाचा पर्यावरण सुरक्षित सुरक्षेचा संदेश देऊन आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे हा विद्यार्थ्यांना संदेश दिला जातो.

मोफत पाठ्यपुस्तके वितरण
शालेय मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजना महाराष्ट्र शासनामार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी राबविण्यात येते या योजने अंतर्गत विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके शाळेच्या संचालिका डॉ स्वाती थोरात मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली.

शैक्षणिक सहल

रक्षाबंधन
रक्षाबंधन साजरा करताना विद्यार्थिनी

मनोरे प्रात्यक्षिक
मनोरे प्रात्यक्षिक सदर करताना विद्यार्थी

महिला मेळावा हळदीकुंकू समारंभ
महिला मेळावा हळदीकुंकू समारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 08 मार्च रोजी विद्यालयामध्ये साजरा केला जातो .महिला हक्क चळवळीचा केंद्रबिंदू मानून हा दिवस पाळला जातो. कार्यक्रमामध्ये परिसरातील सर्व महिलांना विद्यालयामध्ये आमंत्रित केले जाते त्यांना आपले आरोग्य ,आहार, व्यायाम इत्यादी बाबत माहिती दिली जाते. महिलांना विद्यालयामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी काही खेळ स्पर्धा घेतल्या जातात. महिलांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. महिलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो.

पाककला
पाककला म्हणजेच चविष्ट रुचकर आणि पोषक भोजन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पोषक आहाराची माहिती व्हावी यासाठी पाककला प्रदर्शन व त्यांचे व्यवहार ज्ञान विकसित करण्यासाठी व खाद्यपदार्थ विक्री या उपक्रमाचे आयोजन विद्यालयामध्ये केले जाते. या उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी होऊन स्वतः तयार केलेले पौष्टिक पदार्थ प्रदर्शनात मांडतात. खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले जातात.या उपक्रमास विद्यालयातील परिसरात विद्यालयाच्या परिसरातील गावांमधून पालक भेट देतात.

bottom of page