विद्यालयातील सुविधा
संगणक कक्ष
विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी विद्यालयामध्ये संगणक कक्ष अद्ययावत आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर चा अध्यापनात वापर केला जातो इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे दररोज संगणक तास घेतले जातात.

अद्ययावत प्रयोगशाळा
इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहेत. सर्व वर्गांचे नियमित तास होतात. प्रयोग शाळेत भूगोल विषयासाठी लागणारे नकाशे, पृथ्वीगोल उपलब्ध आहेत. विज्ञान विभागामार्फत विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. 28 फेब्रुवारी रोजी विद्यालयामध्ये विज्ञान दिन साजरा केला जातो.

प्रशस्त क्रीडांगण
विद्यालयामध्ये बौद्धिक विकासाबरोबर क्रीडा कौशल्यांचा विकास करण्यात येतो. विद्यालयामध्ये ॲथलेटिक्स,व्हॉलीबॉल ,बुद्धिबळ, बॅडमिंटन तसेच रायफल शूटिंग अशा सर्व खेळांचा सराव घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. 2024 -25 मध्ये रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये चार विद्यार्थी राज्य पातळीवर व एका विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. दरवर्षी वि द्यालयामध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर भरवले जाते.

सी.सी.टी.व्ही कॅमेरे
सीसीटीव्ही कॅमेरा मुळे शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढते. शाळेतील आणि परिसरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवता येते. शाळेत सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण राखण्यास मदत होते.

सुसज्ज ग्रंथालय
विद्यार्थ्यांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यालयामध्ये सुसज्ज असे वाचनालय विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे व ग्रंथालयामध्ये एकूण 4100 एवढी ग्रंथ संख्या आहे. विद्यालयातील विद्यार्थी दररोज दुपारी तीन ते साडेतीन या वेळात पुस्तकांचे वाचन करतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात ग्रंथ प्रदर्शन भरवले जाते.

पिण्याच्या पाण्याची सोय
विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व थंड पाणी पिण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे.

संगीत विभाग
विद्यालयाची सकारात्मक सुरुवात सकाळी परिपाठाने होते. विद्यालयामध्ये उत्तम वाद्यवृंद आहे. विद्यार्थ्यांना गायन वादन कलेला त्यांच्या कलागुणांना या संगीत विभागातूनच संधी मिळते.

अग्निशामक यंत्राची सोय
विद्यालयामध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राची सोय केलेली आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण घेतले आहे.

रायफल शुटींग तयारी
शालेय स्तरावर रायफल शूटिंग एक लोकप्रिय क्रीडा प्रकार बनत चालला आहे आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले येथे नेमबाजीच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते रायफल शूटिंग खेळ प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते विद्यालयांमध्ये दररोज खेळाची तयारी करून घेतली जाते राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्यपा तळीवर रायफल शूटिंग स्पर्धेत शाळेचे खेळाडू यशस्वी ठरले आहेत.

बायोमेट्रिक हजेरी
बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही मुख्याध्यापक, शिक्षक . शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीची अचूकपणे नोंदणी करण्यासाठी वापरली जाते. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस् थिती सुनिश्चित होते आणि गैरहजेरीचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेची व संस्थेची कार्यक्षमता सुधारते.
